भाकीत : ९९ टक्के पाऊस, पीकपाणीही चांगले - Marathi News 24taas.com

भाकीत : ९९ टक्के पाऊस, पीकपाणीही चांगले

www.24taas.com, नवी दिल्ली
 
 
विलासराव देशमुख यांनी सर्वांसाठी एक खूशखबर  दिली आहे. देशात यंदा सर्वसाधारण  सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडण्याची. पर्जन्यवृष्टीचा अंदाज भारतीय हवामान संस्थेच्या (आयएमडी) शास्त्रज्ञांनी वर्तविल्याची माहिती विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांनी गुरूवारीयेथे दिली.
 
 
 
सलग तिसर्यात वर्षी दुष्काळाची स्थिती राहणार नाही. पाऊस चांगला पडण्याची शक्यता असल्याने पीकपाणी चांगले येईल व महागाई कमी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने तयार केलेल्या मोसमी पावसाचे भाकीत  देशमुख यांनी जाहीर केले. यंदा जून ते सप्टेंबर या काळात मोसमी पाऊस  चांगला बरसेल.
 
 
गेल्या ५0 वर्षांतील ८९ सें.मी.च्या सरासरीनुसार ९४ ते १0४ टक्क्यांदरम्यान पाऊस पडेल, असे अंदाज सांगतो. मात्र, एक धोक्याचा इशाराही हवामान खात्याने दिला. पावसाळ्याच्या मध्यात अल निनोचा उद्रेक झाल्यास मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
 

First Published: Friday, April 27, 2012, 08:50


comments powered by Disqus