Last Updated: Monday, November 28, 2011, 14:35
झी 24 तास वेब टीम, मुंबईत्रिपुरा, मणिपूर, मेघालय राज्यांमध्ये लवकरच उच्च न्यायालये स्थापन करण्यात येणार आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्मितीमुळे खटले लवकर निकालात निघू शकतील आणि त्यामुळे दावेदारांच्या वेळेची आणि पैशांची बचत होईल. या राज्यांमध्ये उच्च न्यायालये स्थापन करण्यात यावी ही दीर्घकाळ प्रलंबित असलेली मागणी पूर्ण होणार आहे.
ईशान्य भारतातील सिक्कीम वगळता इतर सर्व राज्यं गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात येतात. ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये गुवाहाटी उच्च न्यायालयाची खंडपीठे आहेत तर सिक्कीमला स्वतंत्र उच्च न्यायालय आहे. त्रिपुरा, मणिपूर, मेघालय राज्यात उच्च न्यायालयाच्या स्थापनेसाठी आवश्यक त्या पायभूत सूविधा तयार असल्याचं त्रिपूरा न्याय आणि विधी विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. गुवाहाटी उच्च न्यायालयाने खटले लवकर निकालात काढण्यासाठी मे महिन्यात सहा राज्यांमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सूविधा सुरु केली होती.
First Published: Monday, November 28, 2011, 14:35