राष्ट्रवादीवर कुरघोडी, CM भेटले PM यांना! - Marathi News 24taas.com

राष्ट्रवादीवर कुरघोडी, CM भेटले PM यांना!

www.24taas.com, नवी दिल्ली
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेत राज्यातल्या दुष्काळी स्थितीबाबत चर्चा केली. यावेळी पॅकेज देण्याची मागणी करण्यात आली. यासाठी काँग्रेसकडून पंतप्रधानांना निवेदनही देण्यात आलं.
 
 
खरं तर उद्या स्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ पंतप्रधानांची भेट घेणार होतं, मात्र राष्ट्रवादीवर कुरघोडी करत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची आजच भेट घेतली. या भेटीवेळी काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मोहनप्रकाश हेही उपस्थित होते.
 
 
राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठी आता राज्य सरकारनं केंद्र सरकारकडं धाव घेतलीय. राज्य सरकारनं केंद्राकडं 2 हजार 281 कोटी रुपयांच्या पॅकेजची मागणी केलीये. तसचं 5 लाख मेट्रीक टन धान्याचीही मागणी केलीये.
 
 
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातलं एक शिष्टमंडळ उद्या पंतप्रधानांना भेटणार आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवारांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 5-5 मंत्र्यांचा समावेश असणार आहे. यावेळी दुष्काळग्रस्त भागासाठी मदतीच्या मागण्या पंतप्रधानांसमोर ठेवण्यात येणार आहेत. राज्यातले केंद्रीय मंत्री आणि सर्वपक्षीय खासदारांचाही यात समावेश असणार आहे.

First Published: Monday, May 7, 2012, 22:00


comments powered by Disqus