केंद्राने केली सरकारची घोर निराशा.. - Marathi News 24taas.com

केंद्राने केली सरकारची घोर निराशा..

www.24taas.com, नवी दिल्ली
 
महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्तांना केंद्राची भरीव मदत मिळेल ही अपेक्षा तुर्त तरी फोल ठरली आहे. दिल्लीत संसद भवनात महाराष्ट्राच्या शिष्टमंडळांची पंतप्रधानांसोबतची बैठक संपली आहे.
 
मात्र पंतप्रधानांनी ठोस असे आश्वासन किंवा मदतीचे पॅकेज जाहीर केलं नाही. मात्र तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्याचा निर्णय झाला. कृषीमंत्री शरद पवार, संसदीय कामकाज मंत्री पवनकुमार बन्सल आणि अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांची ही समिती असेल. ही समिती दुष्काळाचा आढावा घेऊन मग पॅकेजबाबत  निर्णय घेणार आहे.
 
त्यामुळं सध्यातरी राज्यातल्या दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळालेला नाही. बैठकीतल्या निर्णयाकडं राज्यातल्या दुष्काळग्रस्तांचं लक्ष लागलं होतं. आता केंद्राच्या मदतीसाठी वाट पहावी लागणार आहे. या बैठकीला राज्यातले सर्वपक्षी नेते हजर होते.
 
 
 

First Published: Tuesday, May 8, 2012, 16:06


comments powered by Disqus