'एअर इंडिया'चं चाललयं तरी काय? - Marathi News 24taas.com

'एअर इंडिया'चं चाललयं तरी काय?

www.24taas.com, मुंबई
 
एअर इंडियाच्या पायलट्सच्या संपाचा विमानप्रवाशांना सलग दुसऱ्या दिवशीही फटका बसला आहे. पायलट्सच्या संपामुळे काल १३ तर आज ३ आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. यात दोन दिल्लीतून सिंगापूर आणि न्यूयॉर्कची फ्लाईट, तर मुंबईहून न्यूयॉर्ककडे जाणारी फ्लाईट रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, याबाबत विमानतळावर प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
 
रद्द झालेल्या उड्डाणांविषयी एअर इंडियाकडून कोणतीही माहिती दिली जात नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. प्रवाशांना विमानतळावरच ताटकळत बसावं लागलं आहे. पर्यायी व्यवस्थेबाबत कुठलीही माहिती देण्यात येत नाही. तर विमानतळावरील कर्मचारीही कुठलंही सहकार्य करत नसल्यानं प्रवासी संतप्त झाले आहेत.
 
एवढंच नाही तर बोर्डिंग पासेस मिळालेल्या प्रवाशांना त्याचं सामान परत मिळवण्यासाठी ताटकळत बसावं लागलं आहे. दरम्यान, हा संप बेकायदेशीर असल्याचं नागरी उड्डायण मंत्री अजित सिंह यांनी म्हटलं आहे. संपकरी पायलट्सपैकी १० पायलट्सना काल बडतर्फ करण्यात आलं आहे.
 
 
 

First Published: Wednesday, May 9, 2012, 11:06


comments powered by Disqus