Last Updated: Wednesday, August 7, 2013, 12:40
www.24taas.com, झी मीडिया,नवी दिल्ली दिल्लीत दोन युवकांनी एका १७ वर्षीय तरूणीवर गोळी झाडली. यामध्ये ही तरूणी गंभीर जखमी झाली. तिला एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अल्पवयीन तरूणीच्या मानेवर गोळी लागली आहे. दक्षिणपुरी परीसरात या घटनेनंतर घबराट पसरली आहे. रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान दोन मुलांनी तरूणीवर गोळी मारली. गोळी तिच्या मानेला लागली. ती रक्ताच्या थारोळ्यात पडली.
एम्स ट्रामा सेंटर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या हल्ल्याबाबत पोलिसांनी सांगितले की, रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एक फोन आला. काही तरूणांनी गोळीबार केला. यात एक मुलगी जखमी झाली आहे. मानेवर गोळी लागल्याने खूप रक्त गेले. तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलेय. दरम्यान, हा हल्ला का करण्यात आला याची माहिती मिळालेली नाही. दिल्लीत तरूणींवर हल्ला करण्याच्या घटनांत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, August 7, 2013, 12:40