कोंडून ठेवलेल्या पत्नीचा सडलेला मृतदेह सापडला!, Locked away, woman dies of hunger

कोंडून ठेवलेल्या पत्नीचा सडलेला मृतदेह सापडला!

कोंडून ठेवलेल्या पत्नीचा सडलेला मृतदेह सापडला!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

कौटुंबिक वादातून एक महिनाभर पत्नीला अन्न पाण्यावाचून कोंडून ठेवलं... भुकेनं व्याकूळ झालेल्या पत्नीनं तडफडून तडफडून आपले प्राण सोडले... ही घटना एखाद्या खेडेगावात नाही तर रात्रंदिवस धावणाऱ्या मुंबईसारख्या शहरात घडलीय.

नालासोपाऱ्यामध्ये ही धक्कादायक घटना घडलीय. रमेशचंद्र रॉय असं या नराधमाचं नाव आहे. ५० वर्षांचा रमेशचंद्र नालासोपारा पूर्वेकडच्या अलकापुरी इथल्या महेश्वरी या इमारतीत ४५ वर्षीय पत्नी किरण रॉयसह राहत होता. किरणशी भांडण झाल्यानंतर रमेशचंद्र १३ जूनला तिला घरात कोंडून गावाला निघून गेला. घरातलं खाण्यापिण्याचं सामान संपल्यावर किरणची उपासमार होऊ लागली आणि त्यातच तडफडून तडफडून तिनं प्राण सोडला. शेजारपाजाऱ्यांशी फटकून राहाणाऱ्या या कुटुंबाविषयी पुरेशी माहितीही नव्हती.

या घरातून येत असलेल्या दुर्गंधीबद्दल शेजाऱ्यांनी तक्रार केली. तेव्हा पोलिसांनी कुलूप तोडले तेव्हा २० जुलैला हा किरणचा सडलेला मृतदेह पोलिसांच्या निदर्शनास आला. हा मृतदेह इतका सडला होता, की तिची ओळख पटणेही अवघड जात होतं. त्यानंतर, ६ ऑगस्ट रोजी पोलिसांनी या नराधम पतीला अटक केलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, August 7, 2013, 11:00


comments powered by Disqus