Last Updated: Wednesday, August 7, 2013, 13:01
www.24taas.com, झी मीडिया, गोंदिया गोंदिया जिल्ह्यात एका २० वर्षीय गर्भवती महिलेवर तिच्या नवऱ्यासमोरच चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडलीय.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पीडिता आणि तिचा पती रात्री उशीरा आपल्या नातेवाईकांच्या घरून आपल्या घरी परतत होते. याचवेळेस डॉ. आंबेडकर ग्रंथालयाजवळ चार जणांनी त्यांना रोखलं. या चार युवकांनी पतीला बेदम मारहाण केली आणि त्याच्यासमोरचं या परिसरात महिलेवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर या चार जणांनी त्यांच्याकडून त्यांचं किंमती सामानही हिसकावून घेतलं.
पीडित पती-पत्नीनं पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात चार तरुणांना अटक केलीय. राधेलाल सूर्यवंशी (२१), सोनू ऊर्फ ऋषी गुलाब चंद्रीकापुरे (२५), अविनाश रवि फुंदे (२३) आणि नीतिन रमेश खडसे (२३) अशी या चार जणांची नावं आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, August 7, 2013, 13:01