Last Updated: Thursday, August 29, 2013, 15:47
www.24taas.com , झी मीडिया, वॉशिंग्टनज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना आपण पाठिंबा देणार असं म्हटलंय. मात्र त्यासाठी मोदींनी भारतीय जनता पक्ष सोडावा असं अण्णा म्हणाले आहेत. अमेरिकी वृत्तपत्र हफिंग्टन पोस्टनं दिलेल्या बातमीनुसार २० ऑगस्टला डेलावरे इथं हिंदू मंदिरद्वारा आयोजित बैठकीत अण्णा बोलत होते.
डेलावेअर विश्वविद्यालयातले एक असोसिएट प्राध्यापक आणि इंस्टिट्यूट ऑफ सोशल पॉलिसी अँड अंडरस्टॅडिंगचे सदस्य मुक्तेदार खान यांनी या वृत्तपत्रात लिहीलंय की, “अण्णा हजारे यांनी नरेंद्र मोदींवर मोहोर लावली नाही. ते म्हणाले, माझा राजकीय पक्षांवर विश्वास नाही,मोदी हे राजकीय पक्षाचे नेते आहेत. त्यामुळं त्यांच्यावर मोहोर लावता येणार नाही.”
मात्र एक व्यक्ती म्हणून मोदींवर मोहोर लावण्याबद्दल विचारलं असता अण्णा म्हणाले, जर मोदींनी भाजप पक्ष सोडला तर त्यांना समर्थन द्यायला आनंद होईल. अण्णा दोन आठवड्यांच्या अमेरिका दौऱ्यानंतर कालच भारतात परतले आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, August 29, 2013, 15:47