ऑस्ट्रेलियामध्ये शाळेत हिंदीचे धडे, Aus unveils ambitious Asia strategy; to teach Hindi in schools

ऑस्ट्रेलियामध्ये आता शाळेत हिंदीचे धडे

ऑस्ट्रेलियामध्ये आता शाळेत हिंदीचे धडे
www.24taas.com,मेलबर्न

भारताबरोबरच आशियाई देश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंध वृध्दींगत होण्यासाठी ऑस्ट्रेलियाने नवा अध्याय शोधून काढला आहे. त्या दृष्टीने एक पाऊल टाकण्यात आले आहे. संबंध वाढीसाठी ऑस्ट्रेलियांतील शाळांमध्ये हिंदीचे धडे शिकविले जाणार आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या सरकारने शाळांमध्ये हिंदी शिकविण्यासाठी एक योजना आखली आहे. त्याची माहिती आज देण्यात आली. भारताची चांगली अर्थव्यवस्था आणि भारताशी आर्थिक संबंध वाढीसाठी ऑस्ट्रेलिया प्रयत्नशील आहे. आर्थिक संबंध अधिक वाढीवर दोन्ही देश भर देणार आहेत. याबाबतच्या योजनेचा आज ऑस्ट्रेलियात शुभारंभ करण्यात आला.

ऑस्ट्रेलियाने बदलाचा स्वीकार करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्याचाच एक भाग ही योजना असल्याचे सांगितले जात आहे. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड यांनी दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर भर दिला आहे. ज्यावेळी ज्युलिया भारत भेटीवर आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी संबंध सुधारण्यावर भर असेल असे स्पष्ट केले होते. त्याचीच ही नांदी असल्याचे बोलले जात आहे.

आशियाई देशांशी संबंध अधिक वृद्धींगत करण्यासाठी एक व्यापक निती अवलंबिली आहे. जगात धनवान राष्ट्रांमध्ये ऑस्ट्रेलियाचा दबदबा असेल. आशियाई देशांमध्ये मध्यम वर्ग आहे. हा वर्ग डोळ्यासमोर ठेवून काम करण्याची निती ऑस्ट्रेलियाची आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेत एक तरी आशियाई भाषा शिकविण्यावर आपला भर असेल. यात हिंदी, इंडोनेशिया तसेच जपानी भाषा असेल. यासाठी प्रशिक्षण केंद्र, व्याख्यान आणि सिनेमा गृहांमध्ये याबाबत जनजागृती करण्यात येईल, असे ज्युलिया यांनी म्हटले आहे.

First Published: Sunday, October 28, 2012, 22:48


comments powered by Disqus