७० दिवस झोपून राहा... आणि लखपती व्हा!, bed study by nasa

७० दिवस झोपून राहा... आणि लखपती व्हा!

७० दिवस झोपून राहा... आणि लखपती व्हा!

www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन

‘झोपला तो संपला’ असं मोठ्यांच्या तोंडून तुम्ही अनेकदा ऐकलंच असलेच. परंतु, अमेरिकन स्पेस एजन्सी ‘नासा’नं आता ही म्हण मोडीत काढलीय. जास्त वेळ झोपणाऱ्या लोकांवर ‘नासा’ पैशांचा पाऊस पाडणार आहे.

होय, नासानं एक ऑफर आणलीय. यानुसार ७० दिवसांपर्यंत २४ तास बेडवर झोपून राहणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक महिन्याला पाच हजार डॉलर (जवळजवळ सव्वा तीन लाख रुपये) मिळणार आहेत.

नासाच्या या प्रोगामचं नाव आहे ‘बेड स्टडी’... यानुसार कोणत्याही व्यक्तीला ७० दिवसांपर्यंत हॉरिझॉन्टल बेडवर झोपून राहावं लागेल. जास्तीत जास्त काळात मायक्रोग्रॅव्हीटीच्या परिणामांचा प्रभाव जाणून घेण्याचा अभ्यास यातून केला जाणार आहे.

यामाध्यमातून, भाररहित वातावरणात काम करणाऱ्या अंतराळवीरांच्या स्थितीमध्ये सुधार आणण्याचा आपला हेतू असल्याचं नासानं स्पष्ट केलंय.

मेडिकल डेलीच्या अहवालानुसार, परिभ्रमण अवस्थेत जास्त काळ हा अभ्यास केला जाऊ शकत नाही, त्यामुळे हा प्रयोग अंतराळात न करता जमिनीवरच करण्याचा प्रयत्न केला जातोय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, September 19, 2013, 12:25


comments powered by Disqus