भारतीय अभियंत्याचा सिंगापूर स्फोटात मृत्यू,Indian Engineer Killed In Singapore

भारतीय अभियंत्याचा सिंगापूर स्फोटात मृत्यू

भारतीय अभियंत्याचा सिंगापूर स्फोटात मृत्यू
www.24taas.com,सिंगापूर

सिंगापूरमध्ये झालेल्या स्फोटात एका भारतीय अभियंत्याचा मृत्यू झाला. जुरॉग बेटावर बांधकाम सुरू असताना हा स्फोट झाला.

बांधकाम सुरू असताना पाइपलाइनचा स्फोट झाल्याने धरमलिंगम सेल्वम (३२) यांचा जागीच मृत्यू झाला. गेल्या तीन वर्षांपासून ते बीएनएफ इंजिनिअरिंग या कंपनीमध्ये काम करत होते.

दरम्यान, मनुष्यबळ मंत्रालयाने स्फोटाबाबत पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत. धरमलिंगम यांचा गेल्या वर्षी विवाह झाला होता. त्यांना तीन महिन्यांची मुलगी आहे. आज धरमलिंगम यांचे पार्थिव भारतात पाठविण्यात आलेय.

First Published: Wednesday, February 6, 2013, 17:11


comments powered by Disqus