सलग ३० तास काम केल्यानं कॉपीरायटरचा मृत्यूCopywriter works for 30 hours in a row, dies next day

सलग ३० तास काम केल्यानं कॉपीरायटरचा मृत्यू

सलग ३० तास काम केल्यानं कॉपीरायटरचा मृत्यू
www.24taas.com, वृत्तसंस्था, जकार्ता

मेहनत केल्यानं कोणी मरत नाही, अशी म्हण असते. मात्र मेहनत केल्यानं एकाचा मृत्यू झालाय. सलग ३० तास काम केल्यानं इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथल्या कॉपीरायटरचा मृत्यू झाला. ही महिला कॉपीरायटर असून ती ३० तास काम करत असतांना अजिबात झोपलेली नव्हती.

१४ डिसेंबरला मिता डाइरेन नावाच्या कॉपीरायटरनं ट्विटरवर तक्रार असलेला संदेश टाकला. ज्यात लिहीलं होतं की ३० तास सलग तिला काम करावं लागतंय. ट्विटरवर तिनं टाकलेल्या या संदेशानंतर काही वेळानंच तिची तब्येत बिघडली आणि दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला.

मिताची सहकारी म्हणाली सलग काम केल्यानं तिचा मृत्यू झाला. २४ वर्षीय मिताच्या अशा अचानक मृत्यूपूर्वी सात महिन्यांअगोदर ओगिल्वीचे पीआर स्टाफमधील एकाचा हार्टअॅटॅकनं डेस्कवरच मृत्यू झाला होता.

मिता ही खूप हसमुख आणि प्रतिभावंत कॉपीरायटर होती, असं तिचे सहकारी सांगतात. डाइरेन मिताच्या ट्विटर अकाऊंटवर कमेंट्सचा पाऊसच पडतोय. सर्वांनीच इतका वेळ काम करण्याबाबतची वेळ आणि अटींचा निषेध केलाय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, December 19, 2013, 13:05


comments powered by Disqus