पृथ्वीला मिळणार चंद्रावरून वीज!, Earth moon will power!

पृथ्वीला मिळणार चंद्रावरून वीज!

पृथ्वीला मिळणार चंद्रावरून वीज!
www.24taas.com, झी मीडिया,मुंबई

पृथ्वीवरील दिवसेंदिवस ऊर्जेचा वापर वाढत आहे त्यामुळं रोजच्यारोज ऊर्जेच्या समस्या वेगानं वाढत आहे. हा ऊर्जेचा वाढता वापर लक्षात घेऊन जपानच्या एका कंपनीनं यावर तोडगा शोधूव काढला आहे. या कंपनीनं ऊर्जेच्या समस्येवर उपाय म्हणून चंद्राच्या विषुववृत्तावर ऊर्जेच्या सौर पट्टयांचा संच लावून त्यात सूर्यप्रकाशापासून वीज निर्माण करून ती पृथ्वीवर पाठवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या सौरपट्टयांच्या संचाची चंद्राच्या विषुववृत्तावरील उभारणी इ.स. २०३५मध्ये सुरू करण्यात येईल. तसंच या कंपनीच्या मते ही सौर यंत्रणा १३०० टेरावॅट इतकी वीज पृथ्वीवर पाठवू शकेल. या प्रकल्पाचं नाव ‘ल्युना रिंग’ असून तो ‘शिमीझू कार्पोरेशननं’ मांडला आहे.

या सौर घटांच्या पट्टयाची रुंदी ही ४०० किलोमीटर इतकी असून हे सौर यंत्र चंद्राच्या विषुववृत्तीय प्रदेशात ११,००० कि.मी एवढ्या विस्तीर्ण भागात उभारले जाणार आहे. त्यामुळं वीजनिर्मिती ही मोठ्या प्रमाणात आणि सातत्यानं होऊ शकतं, असं कंपनीकडून सांगण्यात आलंय.

पृथ्वीवरुन दूरनियंत्रणाच्या माध्यमातून यंत्रमानवांद्वारे चंद्रावर चोवीस तास काम करण्यात येईल. त्या ठिकाणी बांधकाम करण्यात येणार असू त्या काँक्रिटवर सौरपट्टय़ा बसवण्यात येणार आहे. त्यांच्या वायर्सनी सूक्ष्मलहरी या लेसर प्रसारण केंद्रांना जोडण्यात येणार आहे. तसंच फिजीर्स ओआरजी या संकेतस्थळावरुन हे वृत्त देण्यात आलं आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 3, 2013, 16:59


comments powered by Disqus