भयंकर! पोटच्या गोळ्याला मारून भरलं पोट…, Father Murders Children For Food In Famine-Plagued North Korea ...

भयंकर! पोटच्या गोळ्यालाच मारून भरलं पोट…

भयंकर! पोटच्या गोळ्यालाच मारून भरलं पोट…
www.24taas.com, प्योंग्यांग

उत्तर कोरियात पडलेल्या दुष्काळानं आपल्याच पोटच्या गोळ्याला मारून खाण्याची वेळ नागरिकांवर आलीय. भूकेचा कहर या नागरिकांवर असा काही कोसळलाय की, कबरीमध्ये पुरलेल्या आपल्या नातेवाईकांचे मृतदेहही उकरून काढून या नागरिकांना खावे लागत आहेत.

नुकतंच, एका नरभक्षी बापानं त्याच्या दोन्ही मुलांच्या मृतदेहांवरच मांस शिजवून खाल्ल्याचा प्रकार घडलाय. हा गंभीर प्रकार सरकारला समजल्यावर त्या बापाला गोळ्या घालून ठार मारले गेले. तर खाण्यासाठी आपल्या दोन मुलांना ठार करणार्‍या एका व्यक्तीला सरकारने फासावर लटकविले आहे. उपासमारीने बेजार झालेल्या एका आजोबाने आपल्या नातवाचे पुरलेले प्रेत खाण्यासाठी उकरून काढल्याचा व आणखी एका व्यक्तीने आपले मूल उकडून खाल्ल्याचे अंगावर काटा आणणारे तपशील समोर आलेत.

एरव्ही कमालीच्या गोपनीयतेमुळे कोणतीही माहिती बाहेर न येणाऱ्या उत्तर कोरियात ‘सिटिझन्स र्जनालिस्ट्स’च्या माध्यमातून जपानमधील ओसाका येथील ‘एशियन प्रेस’नं संकलित केलेल्या माहितीच्या आधारे लंडनमधील ‘संडे टाइम्स’नं ही माहिती दिलीय.

उत्तर कोरिया सरकारने या बातम्यांचे अधिकृतपणे खंडन केलेले नाही किंवा त्यांना दुजोराही दिलेला नाही. अणू चाचण्यांमुळे संयुक्त राष्ट्र संघाने लादलेल्या आर्थिक बंधनांनंतरही क्षेपणास्त्राची चाचणी करणार्याल हट्टी राज्यकर्त्यांमुळे नागरिकांची ही दशा झाली आहे.

First Published: Wednesday, January 30, 2013, 11:58


comments powered by Disqus