कराची विमानतळावर अतिरेकी हल्ला, 23 जण ठारKarachi airport terror attack: 23 dead, all 10 gunmen neutr

कराची विमानतळावर अतिरेकी हल्ला, 23 जण ठार

कराची विमानतळावर अतिरेकी हल्ला, 23 जण ठार
www.24taas.com, वृत्तसंस्था, कराची

पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराची अतिरेकी हल्ल्यानं हादरलीये. कराचीतील जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळावर अतिरेक्यांनी हल्ला केला. पोलिसांच्या वेशात आलेल्या 10 अतिरेक्यांनी अचानक विमानतळावर केलेल्या या हल्ल्यात सुरक्षारक्षकांसह 23 निरपराधांचा बळी गेलाय.

विमानतळावरील जुन्या टर्मिनलवर या अतिरेक्यांनी हल्ला केला. अचानक विमानतळात घुसून त्यांनी हॅन्डग्रेनेड फेकण्यास सुरूवात केली आणि अंदाधूंद गोळीबार केला. विमानतळावरील इंधन साठ्यालाही तसंच दोन विमानांनाही आग लावली. विमानाचं अपहरण करण्याच्या हेतूने आलेल्या या अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी अखेरीस लष्कराला पाचारण करण्यात आले.

तब्बल पाच तास चाललेल्या या ऑपरेशनमध्ये 10 अतिरेक्यांना ठार मारण्यास यश आलंय. हजला जाणारे यात्रेकरू आणि VVIP हे अतिरेक्यांच्या निशाण्यावर होते. दरम्यान या हल्ल्यामुळे अनेक विमानांचा मार्ग बदलण्यात आलाय.

दरम्यान, पाकिस्तानामधील या हल्ल्यानंतर भारतामध्येही हाय अर्लट जारी करण्यात आलाय. मुंबई आणि दिल्ली एअरपोर्टवरील सुरक्षा वाढवण्यात आलीय. दोन्ही एअरपोर्टला सध्या छावणीचं स्वरुप प्राप्त झालंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, June 9, 2014, 09:11


comments powered by Disqus