नवाझ शरीफ यांनी मोदींच्या आईसाठी पाठविले गिफ्ट, Nawaz Sharif sent gifts for Modi mother`s saree

नवाझ शरीफ यांनी मोदींच्या आईसाठी पाठविले गिफ्ट

नवाझ शरीफ यांनी मोदींच्या आईसाठी पाठविले गिफ्ट
www.24taas.com, झी मीडिया, इस्लामाबाद

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भारत- पाकिस्तान संबंध कसे राहणार, हे भविष्यात दिसेलच. पण सध्या मोदी आणि शरीफ या दोघांमध्ये सध्या गिफ्ट आणि रिटर्न गिफ्टचा सिलसिला सुरू झालाय.

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मोदींची आई हिराबेन यांच्यासाठी एक सफेद साडी भेट दिलीय. मोदींनीच यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिलीय. याआधी मोदींनी नवाज शरीफ यांच्या आईसाठी एक शाल पाठवली होती.

त्यावेळी नवाज शरीफांच्या मुलीनं ट्विट करुन मोदींचे आभार मानले होते. आता शरीफांनी मोदींच्या आईला साडी पाठवल्यावर मोदींनी ट्विट करुन शरीफांचे आभार मानलेत.

First Published: Thursday, June 5, 2014, 18:18


comments powered by Disqus