Last Updated: Thursday, March 13, 2014, 09:01
www.24taas.com, झी मीडिया, काठमांडू लवकर खाजगी कंपन्यांना हिमालय भाड्याने मिळण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. टूरिझमसाठी नेपाळ सरकार सध्या या पर्यायाचा विचार करत आहे.
पर्यटनाला चालना देण्यासाठी खाजगी कंपन्यांना हिमालयाच्या टेकड्या लीजवर देण्याची एक योजना सध्या नेपाळ सरकारच्या विचाराधीन आहे. यामागे हिमालयाची स्वच्छता आणि देशाच्या आर्थिक व्यवस्थेला पाठबळ असा दुहेरी हेतू नेपाळ सरकारचा आहे.
यानुसार, हिमालय पर्वताच्या उत्तुंग अशा ३२६ टेकड्या लीज वर दिल्या जाऊ शकतात. त्यामुळे एव्हरेस्टवर चढण्याची स्वप्न पाहणाऱ्यांनाही या भागाकडे आकर्षित करता येणं शक्य आहे. तसंच माऊंटेनिअरिंगचा ध्यास असणाऱ्या अनेक तरुणांना या टेकड्यांवर चढण्यासाठी होणारा खर्चही कमी होईल.
नेपाळशिवाय इतर परदेशी कंपन्यांनाही या टेकड्या भाडेतत्वावर दिल्या जाऊ शकतात. हिमशिखरे भाडेपट्टीवर घेणाऱ्या कंपन्या स्वच्छता, पर्यटकांसाठी शिखर परिसरात राहण्याची व्यवस्था, वैद्यकीय सेवा आदी सोयी पुरवणार आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, March 13, 2014, 09:01