Last Updated: Thursday, January 16, 2014, 19:34
www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या वैवाहिक जीवनात एक वादळ उठले आहे. एका अमेरिकेतील वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार ओबामा यांची पत्नी मिशेल ओबामा घटस्फोट घेण्याच्या तयारी आहे. मीडियातील वृतानुसार ओबामा पत्नी मिशेलला सोडून आपल्या मुलींसह हवाईला रवाना झाले तेव्हा दोघांमध्ये वाद निर्माण झाला.
हवाईमध्ये ओबामा यांनी आपल्या कुटुंबियांसमवत ख्रिसमस आणि नववर्ष साजरं केलं. वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार नात्यात आलेली कटुता २२ वर्ष जुन्या लग्न तुटण्याचे संकेत आहे. काही अन्य वृत्तपत्रांनुसार दोघांमध्ये वैवाहिक वाद निर्माण झाले आहे. याचे पडसाद मिशेल ओबामा यांच्या ५० व्या वाढदिवसावरही पडले.
एका टॅबलॉइडने दिलेल्या वृत्तानुसार ओबामा यांची धोकेबाजी सिक्रेट सव्हिसने एकदा नाही तर दोनदा लपवली. मिशेलला माहित झाले की त्यावेळी ओबामांसोबत एक महिला आपत्तीजनक अवस्थेत सापडली. एका गुप्तचरानुसार हे प्रकरण दाबून टाकले. एका सिक्रेट सर्विस एजंटने ओबामा यांना त्या महिलेसोबत विचित्र अवस्थेत पाहिले होतो. त्यावेळी मिशेल शहरातून बाहेर होती.
ओव्हल ऑफिस इनसाडरच्या हवाल्याने एका वृत्तपत्राने सांगितले की, व्हाइट हाऊसमध्ये ओबामा आणि मिशेल वेगवेगळ्या बेडरूमध्ये झोपतात. व्हाइट हाऊसतर्फे देण्यात आलेल्या वक्तव्यानुसार राष्ट्रपती बराक ओबामा यांनी आपल्या पत्नीला वाढदिवसाचे गिफ्ट दिले आहे. त्यानुसार अमेरिकेच्या प्रथम महिला आपला वाढदिवस आपल्या जुन्या मित्रपरिवारसोबत हवाईमध्ये साजरा करणार आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, January 16, 2014, 19:34