pakistan in nuclear weapons

पाकमध्ये अणु क्षेपणास्त्रांची निर्मिती जोरात

पाकमध्ये अणु क्षेपणास्त्रांची निर्मिती जोरात
www.24taas.com, वॉशिंग्टन

भारताला लक्ष्य करून पाकिस्तान आपल्या अणु हत्यारांमध्ये सातत्यानं बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नात आहे. अशी माहिती खळबळजनक माहिती अमेरिकन काँग्रेसनं आपल्या एका रिपोर्टमध्ये दिलीय.

अणु विस्फोटकांचा सातत्यानं प्रगती करत पाकिस्तान भारताविरुद्ध जंग छेडण्याच्या प्रयत्नात असू शकतं, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं गेलंय. हा रिपोर्ट काँग्रेसनल रिसर्च सर्व्हिसनं अमेरिकन कायदे निर्मात्यांसाठी बनवला आहे. ‘सीआरएस’च्या माहितीनुसार, भारताकडून असलेल्या धोका केंद्रस्थानी ठेऊन पाकिस्ताननं हा अणु विस्फोटक प्रयोग सुरू केलाय. आपल्याला भारताकडून धोका आहे आहे आणि आपण घाबरलोय, असा दिखाव्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जातोय.

भारताच्या अणु संशोधनात होत चाललेली प्रगती पाहून आपल्या बचावासाठी अणु हत्यारांच्या प्रगतीसाठी पाकिस्ताननं कंबर कसलीय. या हत्यारांच्या वाहतुकीसाठी वाहनांच्या संख्येतही भर करण्यात येत आहे. भविष्यात इस्लामाबाद यासाठी आणखी तेजीनं भर घालण्याची शक्यताही या रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आलीय.


First Published: Thursday, August 9, 2012, 14:06


comments powered by Disqus