Last Updated: Sunday, April 28, 2013, 15:41
www.24taas.com, झी मीडिया, इस्लामाबाद सरबजीतची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्याचे कुटुंबिय सध्या काळजीत आहे. आज सरबजीतचे कुटुंबीय पाकिस्तानात पोहचले. वडिलांना भारतात पाठवावं अशी मागणी सरबजीतची मुलगी पूनम हिनं केलीय.
मात्र सरबजीतची चौकशी करायला गेलेल्या दोन अधिकाऱ्यांना सरबजीतला भेटून दिले गेले नाही. याबाबत जीना हॉस्पिटलच्या प्रबंधकांना विचारले असता भारतीय अधिकारी येथे येणार आहेत याची आम्हाला काहीच कल्पना देण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांना आम्ही भेटून दिले नाही असं त्यांनी उत्तर दिलं.
पाकिस्तानच्या तुरूंगात हेरगिरीच्या आरोपाखाली डांबण्यात आलेल्या भारतीय सरबजीतवर कोट लखपत जेलमध्ये काही कैद्यानी प्राणघातक हल्ला केला होता. जड वस्तूच्या साहाय्याने मारहाण केल्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक आहे. सरबजीत `डीप कोमात` आहे.
First Published: Sunday, April 28, 2013, 15:41