‘शट डाऊन’मुळं अमेरिकेचं होणार मोठं नुकसान - ओबामाshutdown would harm the U.S. economy: Obama

‘शट डाऊन’मुळं अमेरिकेचं होणार मोठं नुकसान - ओबामा

‘शट डाऊन’मुळं अमेरिकेचं होणार मोठं नुकसान - ओबामा
www.24taas.com , वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

अमेरिकेत झालेल्या शट डाऊनचा परिणाम तिथल्या अर्थव्यवस्थेवर होऊन अमेरिकेचं मोठं नुकसान होण्याची शक्यता राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केलीय. अमेरिकेतल्या सद्य परिस्थितीबाबत रिपब्लिकन पार्टीला जबाबदार असल्याचं ओबामा म्हणाले. ज्यामुळं १० लाख कर्मचाऱ्यांना सक्तीच्या सुट्टीवर जावं लागलंय.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं महत्त्वाकांशी विधेयक असलेलं स्वास्थ विधेयक ‘ओबामाकेअर’वरुन झालेल्या मतभेदांमुळं रिपब्लिकन आणि सत्ताधारी ड्रेमॉक्रेटिक पक्षांमध्ये खर्च आणि बजेटवरुन सहमती झाली नाही. त्यामुळंच अमेरिकेवर हे ‘शट डाऊन’चं संकट ओढवलं.

ओबामा म्हणाले की, मला माहितीये सरकारचं कामकाज जितके दिवस ठप्प राहिल त्याचा दुष्परिणाम खूप होईल आणि त्यामुळं अनेक कुटुंबांना त्याचा फटका बसेल. व्यापारावर सुद्धा परिणाम होईल. ओबामांनी बजेट पास करण्यासाठी काँग्रेसला विनंती केलीय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, October 2, 2013, 12:00


comments powered by Disqus