२०३० सालापर्यंत जगावर जलसंकट कोसळणार!, Since 2030 the World will start facing Water problem

२०३० सालापर्यंत जगावर जलसंकट कोसळणार!

२०३० सालापर्यंत जगावर जलसंकट कोसळणार!
www.24taas.com, झी मीडिया, बुडापेस्ट

आत्ताच योग्य ती पावलं न उचलल्यास २०३० सालापर्यंत लोकसंख्येला पुरेसं पाणी पृथ्वीतलावर शिल्लक राहाणार नाही, असा इशारा संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान की-मून यांनी दिला आहे. २०३० सालापासून फार मोठं जलसंकट उभं राहाणार आहे.

जलसंकट म्हणजे जेव्हा प्रती व्यक्तीसाठी वर्षाला १,७०० घन मीटरहूनही कमी पाणी उपलब्ध असतं. समाचार एजंसी सिन्हुआने दिलेल्या अहवालानुसार मंगळवारी हंगेरीचे राष्ट्रपती जेनोस एडर यांच्यासोबत बुडापेस्टमध्ये जल शिखर सम्मेलनात बान की-मून यांनी जलसंकटाबद्दल सूचना दिली. पाणी ही कुठल्याही सरकारची प्राथमिकता आहे. मात्र कुठलंही सरकार हे काम एकहाती करू शकत नाही. यासाठी सर्व देशांतील सर्व घटकांना एकत्र आणायची गरज आहे.

याच विषयावर चर्चा करण्यासाठी पुढील वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात जलवायू परिवर्तनावर विशेष सम्मेलन घेण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. या सम्मेलनासाठी सर्व देशांना आमंत्रित करण्यात येणार आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, October 15, 2013, 13:38


comments powered by Disqus