पाकमधील लादेनचे घर जमीनदोस्त? - Marathi News 24taas.com

पाकमधील लादेनचे घर जमीनदोस्त?

www.24taas.com,  इस्लामाबाद 
 
पाकिस्तानमधील अबोटाबाद येथील दहशतवादी ओसामा बीन लादेन याचे राहते घर पाडण्यात येण्याची शक्यता आहे. घर घर पाडण्याबाबतचे वृत्त आहे. पाकमध्ये घुसून अमेरिकन लष्कराने लादेनचा खातमा केला होता.
 
 
अबोटाबाद येथील तीन मजली इमारतीत लादेन  ५ वर्षे मुक्कामाला होता. लादेनचे आबोटाबाद येथील निवासस्थान रॉकेट हल्ल्याच्या मदतीने पाडण्याची योजना पाकिस्तानी लष्कराने आखली आहे. अमेरिकी सैन्याने लादेनचा खातमा केल्यावर त्याच्या निवासस्थानाचा उपयोग दहशतवाद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त होत आहे. लादेनच्या निवासस्थानाचे रूपांतर धार्मिक स्थळात होऊ नये म्हणून हा खबरदारी म्हणून हे घर पाडण्यात येत असल्याचे वृत्त आहे.
 
 
लादेनला ठार मारल्यानंतर पाकिस्तानात उठलेल्या जनक्षोभामुळे अबोटाबाद येथील निवासस्थानाला जसच्या तसे ठेवण्यात आले होते. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये या निवासस्थानाच्या दुरुपयोगासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती मिळाल्याने पाकिस्तानी लष्कराने दहशतवादी ओसामा बीन लादेन याचे राहते घर नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

First Published: Thursday, January 12, 2012, 13:42


comments powered by Disqus