Last Updated: Monday, February 13, 2012, 11:21
www.24taas.com, इस्लामाबाद पाकचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्यावर कोर्ट अवमान प्रकरणी आरोप निश्चित करण्यात आले. आज सकाळी सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरु झाली. गिलानी यांच्यावरील आरोपपत्राचे वाचन झाले. गिलानी यांनी आपल्यावरील आरोप फेटाळत निर्दोष असल्याचा दावा केला आहे.
गिलानींच्या वकीलांनी उत्तर देण्यासाठी अकरा दिवसांचा अवधी मागितला,तर कोर्टाने 16 फेब्रुवारीपर्यंत पुरावे सादर करण्याचे आदेश दिलेत. गिलानी यांना 27 फेब्रुवारीपर्यंत बाजू मांडण्याचा अवधी सुप्रीम कोर्टानं दिला आहे.
असीफ अली झरदारी यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे खटले पुन्हा चालवण्यास नकार दिल्यानं गिलानी यांच्यावर कोर्ट अवमानाचा आरोप ठेवण्यात आला आहे. गिलानींविरुद्ध खटला सुरु झाल्यानं पंतप्रधानपद सोडावं लागण्याची शक्यता आहे.
First Published: Monday, February 13, 2012, 11:21