एके -४७ रायफल निर्मात्याचे निधन, The AK-47 rifle creator died

एके -४७ रायफल निर्मात्याचे निधन

एके -४७ रायफल निर्मात्याचे निधन
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

जगभरात प्रसिद्ध झालेल्या कॅलेशनिकोव्ह रायफल म्हणेजच एके रायफलचा निर्माता मिखाईल कॅलेशनिकोव्ह यांचं निधन झालं. तत्कालीन युएसएसआरसाठी त्यांनी सर्वप्रथम एके-४७ य़ा रायफलची निर्मिती केली होती. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांनी निर्माण केलेली अव्हटोमॅट कॅलेशनिकोव्ह ४७ म्हणजेच एके -४७ ही असॉल्ट रायफल जगभरात अतिशय प्रसिद्ध झाली.

विविध देशांच्या सैन्यात या रायफलचा वापर होतोच. त्याचबरोबर अनेक देशातल्या बंडखोरांसह, अतिरेक्यांचीही पसंती याच रायफलला मिळाली. अतिरेक्यांचं हे आवडतं हत्यार झाल्यामुळे अर्थातच जगभरातून कॅलेशनिकोव्ह यांच्यावर तुफान टीकाही झाली होती. आजच्या घडीला एके सिरीजमधल्या जवळपास १०० लाख रायफल जगभरात वापरल्या जातात.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 24, 2013, 18:09


comments powered by Disqus