ऐश्वर्या राय-बच्चनची कान फेस्टिवलमध्ये गोची sonam kapoor replace aishwarya rai bachhan in cannes fes

ऐश्वर्या राय-बच्चनची कान फेस्टिवलमध्ये गोची

ऐश्वर्या राय-बच्चनची कान फेस्टिवलमध्ये गोची
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

ऐश्वर्या राय-बच्चनला हॉलिवूडमध्ये एन्ट्री मिळाल्यापासून, तिची कान फेस्टिवलमधील रेड कार्पेटवरील पोज नेहमीच लोकांना भावून गेली. यातच `लॉरिअल` ब्रँडची ऐश्वर्या ब्रॅन्ड अॅम्बेसेडर झाल्यापासून, तिनं गेले काही वर्ष `लॉरिअल`चे प्रीतिनिधित्व कान फेस्टिवलमध्ये केलं. पण गेल्या वर्षापासून `लॉरिअल`ला सोनम कपूर कान फेस्टिवलमध्ये प्रेसेंट करत आहे. या कारणानेच ऐश्वर्याला आता `कान`वारीतील रेड कार्पेटवरून टीका-टोमण्यांना सामोरं जावं लागत आहे.

लग्नानंतर ऐश्वर्याने सिनेमे कमी केले. यानंतर आराध्या बच्चनचा जन्म झाला आणि ऐश्वर्याचं वजन वाढलं. या कारणानेच ऍशला आता `लॉरिअल` ब्रँडपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न देखील होत आहे. यामुळे कान फेस्टिवलमध्ये जिथे जगभरातील सेलिब्रिटीज एकत्र येतात. तिथेच रेड कार्पेटवर ऐश्वर्या वाढलेल्या वजनामूळे आणि कमी होत चाललेल्या ब्रँड्समूळे हास्याचा विषय बनत चालली आहे.

गेल्या वर्षी प्रमाणेच यावर्षीही सोनम कपूरच पुन्हा एकदा `लॉरिअल`चे प्रतिनिधीत्व कान फेस्टिवलमध्ये करणार आहे. तर ऐश्वर्या यावेळी केवळ एकच दिवस `कान`मध्ये सहभाग घेणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, May 18, 2014, 12:25


comments powered by Disqus