Last Updated: Saturday, May 10, 2014, 11:31
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई सनी लिऑनला सध्याच्या काळात मोठ्या बॅनरचा सिनेमा मिळत नसला तरी, सनीकडे चित्रपटांची कमतरता नाही. येणाऱ्या काळात तर सनी चक्क मराठीच्या प्रेमात पडल्या सारखीच दिसणार आहे. या मागे कारणही तसंच आहे. सनी येणाऱ्या काही महिन्यांत एक मराठी सिनेमा करणार आहे. तर एका सिनेमात मराठी मुलीची भुमिका साकारणार आहे.
सनी येणाऱ्या काळात `मस्तीजादें` या हिंदी सिनेमामध्ये `लैला लेले` नावाच्या मराठी मुलीची भुमिका करणार आहे. या सिमेनात मात्र सनी मराठीत बोलणार की नाही हे अजून कळालेलं नाही. हा सिनेमा प्रीतिश नंदी कम्युनिकेशन्स तयार करत असून, सिनेमाचं दिग्दर्शन मिलाप झवेरी करणार आहेत.
सनीचा दुसरा सिनेमा हा मराठी असून, या सिनेमात सनी आपल्या भूतकाळातील आयुष्याच्या कारकिर्दित जाणार आहे. म्हणजेच या सिनेमात सनी एका पोर्नस्टारची भूमिका करणार आहे. या सिनेमा म्हणजे एक पोर्नस्टार आणि एक मराठी मुलगा यांच्या प्रेमाची कहाणी असणार आहे.
या सिनेमाचे दिग्दर्शन सुजय डहाके करणार आहेत. सनीच्या या मराठी सिनेमाचं नाव `व्हल्गर अॅक्टिव्हिटीज इनकॉर्पोरेटेड` म्हणजेच `अश्लील उद्योग मित्रमंडळ` असे ठेवण्यात आले आहे. या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात या सिनेमाचं शूटींग सुरू होणार आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, May 10, 2014, 11:31