सलमान बॉलिवूडची लाईफलाईन- इति बेबो - Marathi News 24taas.com

सलमान बॉलिवूडची लाईफलाईन- इति बेबो

www.24taas.com, मुंबई
 
बॉलिवूडमध्ये करिना कपूर आता नंबर वन हिरोईन आहे यात काहीच शंका नाही. प्रचंड गुणवत्ता, देखणी आणि नवाबजादा सैफ असं सारंकाही तिच्यापाशी आहे अजुन काय हवं ? नाही का. सध्या बेबो एजंट विनोद या तिच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आणि तूर्तास तेच तिच्यासाठी सर्वाधिक महत्वाचं आहे.
 
एजंट विनोदमध्ये बेबो इतकी गुंतून गेली आहे की सैफसोबतचा विवाहही तिच्यासाठी आता महत्वाचा नाही. दिल्लीत एजंट विनोदच्या प्रमोशनसाठी बेबो गेली असताना तिने बॉलिवूड आणि खान मंडळींबद्दल तसंच त्यांच्याशी असलेल्या संबंधाबद्दल ती पत्रकारांशी भरभरून बोलली.
 
सलमान खानबद्दल विचारलं असता सलमान खान स्विटहार्ट आहे आणि तो फिल्म इंडस्ट्रीचा लाईफलाईन असल्याचं मत तिने व्यक्त केलं. शाहरुख खानमध्ये प्रचंड उर्जा आहे तर परफेक्शन्सिट आमीर जिनियस असल्याचं मत बेबोनं व्यक्त केलं आहे. सैफमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका करण्याची प्रचंड क्षमता असल्याचंही बेबोचं म्हणणं आहे. लंगड त्यागी असो की एजंट विनोद अशा टोकाची भूमिका करण्याचं कौशल्य आणि क्षमता सैफमध्येच असल्याचं बेबोने सांगितलं. सैफ कोणतीही भूमिका सहज आणि लिलया साकारू शकतो असं बेबोचं म्हणणं आहे.
 
याबाबतीत वाद असण्याचं काहीच कारण नाही वयाने मोठ्या असेलल्या अमृता सिंग सोबत संसार मांडल्यानंतर आता वयाने बरीच लहान असलेल्या करिना कपूर सोबत नवाबजादे दुसरा घरोबा करत आहेत यातून हे सिध्द होतंच. सैफ अली खानची  रेंज भूमिका करण्याची असो किंवा ललनांना प्रभावीत करण्याची अफाटच म्हणावी लागेल नाही का?
 

First Published: Sunday, February 19, 2012, 19:39


comments powered by Disqus