पाक बुरा न मानो कोहली है- पूनम पांडे - Marathi News 24taas.com

पाक बुरा न मानो कोहली है- पूनम पांडे

 www.24taas.com,मुंबई
पाकिस्तानच्या ३२९ धावांच्या पाठलाग करताना १८३ धावांची ऐतिहासिक खेळी करणाऱ्या विराट कोहलीवर सध्या सर्व बाजूंनी कौतुकांचा वर्षाव होत आहे. कौतुक करण्यामध्ये क्रिकेट फॅन आणि कधीही कपडे उतरविण्यास तयार असलेल्या पूनम पांडेचाही समावेश आहे. तीने चक्क पाकिस्तानी संघाला खास आपल्या भाषेत गुगली टाकला आहे.
 
भारताने सामना जिंकल्यावर या बयेने लगेच ट्विटरवर ट्विट केले आणि विराटला ट्विटरच्या माध्यमातून एक दिर्घ चुंबन दिले. विराट हा टीम इंडियाचा रॉक स्टार आहे, असे म्हणून आता आपलं दुकान विराटची स्तुति करून सुरू होणार हे तिनं हेरलं.
 
 
ट्विटिव करतानी ती म्हणाली, वॉव... वॉट मॅच...म्युआआआआआआ लव यू विराट असे दिर्घ चुंबन तिने ट्विटरच्या माध्यमातून दिले. खूप छान खेळलास विराट... तुझ्या धैर्याबद्दल खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तुझ्यामुळे आम्हांला अभिमानाचा क्षण अनुभवाला मिळाला. त्यामुळे आम्ही ही स्पेशल इनिंग नेहमी लक्षात ठेवू.
 
ये ये ये.. कोहली हिरा आहे... पाकिस्तानवालो बुरा ना मानो कोहली है! अशी खास टीप्पणीही केली.

First Published: Monday, March 19, 2012, 13:39


comments powered by Disqus