Last Updated: Wednesday, May 22, 2013, 07:53
www.24taas.comस्त्री व पुरुषांना ज्या प्रमाणे जीवन जगण्यासाठी अन्न,पाणी, याची आवश्कता लागते त्या प्रमाणे त्यांना लैंगिक संबंधही आवश्यक आहे. ते नैसर्गिक कृत्य आहे. तरी सुद्धा ४० ते ६० या वयोगटातील बहुतेक पुरुषाला आपला धंदा-व्यवसाय,कार्यालय, उद्योग यामध्ये म्हणजे करियर मध्ये इतके गुंतून गेलेले असतात की, त्यांना इतर गोष्टींचा विचार करायला वेळ नसतो.आणि काही वेळा इच्छा असून सुद्धा त्या गोष्टीन कडे दुर्लक्ष करावे लागते.
कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी ते आग्रक्रम देतात. आपल्या कामधंद्या विषयी पत्नी बरोबर बोलण्यासाठी त्याना वेळ सुद्धा मिळत नाही.एखाद्या दिवशी त्यांच्या कामधंद्यात काही बिघाड झाला तर त्यांची कामेच्छा होत नाही. किंवा कमी होते. आणि ते जर खुशीत असले तर त्यांची काम इच्छा उफाळून येते.
स्त्रियांना सुद्धा घरातील, बाहेरील ऐवढी कामे करावी लागतात की, कुटुंबाचे पालन पोषण करण्यातच स्त्री ही पन्नाशीतील होते. त्यामुळे खूप काम केल्यामुळे थकवा येतो आणि शरीर साथ देतनाही म्हणून लैंगिक नैराश्य निर्माण होते. आणि या सर्व करणामुळे स्त्रीला लैंगिक नैराश्य निर्माण होते.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, May 22, 2013, 07:47