Last Updated: Wednesday, August 21, 2013, 14:35
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मृत्यूनंतरही सनातन प्रभातकडून त्यांची अवहेलना सुरुच आहे. दाभोलकरांचा झालेला मृत्यू ही ईश्वरी कृपाच असल्याची आगपाखड सनातनच्या मुखपत्रातून करण्यात आलीय.
डॉ. जयंत आठवले यांनी लिहीलेल्या या संतापजनक लेखात जन्म आणि मृत्यू हे प्रारब्धामुळंच होतात, असं विधान करण्यात आलंय. आजारानं अंथरुणाला खिळून मरण्यापेक्षा किंवा शल्यकर्मानंतर वेदनादायी मृत्यू येण्यापेक्षा असा आलेला हा मृत्यू, ही ईश्वराची कृपाच असल्याची मुक्ताफळंही त्यात उधळण्यात आलीय.
डॉ. दाभोलकर इश्वर मानत नसले, तरी त्यांच्या आत्म्याला इश्वर शांती देवो, असंही या लेखात लिहिण्यात आलंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Wednesday, August 21, 2013, 14:18