दाभोलकरांवर ‘संगम माहुली’त अंत्यसंस्कार, funeral of Satara on Narendra Dabholkar

दाभोलकरांवर ‘संगम माहुली’त अंत्यसंस्कार

दाभोलकरांवर ‘संगम माहुली’त  अंत्यसंस्कार
www.24taas.com , झी मीडिया, सातारा

सातारा जिल्ह्यातील संगम माहुली या मूळगावी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची मुलगी मुक्ता हिने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.

यावेळी पुरोगामी विचारवंताला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो लोकांचा जनसमुदाय लोटला होता. दरम्यान, दाभोलकरांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री पृथ्वाराज चव्हाण यांना अंनिसच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. अखेर पोलीस बंदोबस्तात पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री आर.आर.पाटील, मंत्री हर्षवर्धन पाटील यांना बाहेर काढण्यात आलं.

हत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. देशभरातून पुरोगामित्वाची हत्या झाल्याची प्रतिक्रीया व्यक्त होतेयं. मुख्यंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर.आर. पाटील याच बरोबर अनेक राजकिय नेत्यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केलायं. सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देणारे एक आदर्श व्यक्तिमत्त्व आपल्यातून गेलयं. त्यांच्या जाण्यानं अंधश्रध्दा निर्मूलन चळवळीची आणि महाराष्ट्राची मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया अनेक मान्यवरांनी व्यक्त केली आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, August 21, 2013, 09:00


comments powered by Disqus