दोन दिवसांत महाराष्ट्र भिजणार चिंब! Monsoon within 2 days in Maharashtra

दोन दिवसांत महाराष्ट्र भिजणार चिंब!

दोन दिवसांत महाराष्ट्र भिजणार चिंब!
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

राज्यात अनेक ठिकाणी मान्सुनपुर्व पावसाने हजेरी लावली. मात्र आता सर्वांना आस लागली आहे ती मान्सूनची.

मान्सून उत्तर कर्नाटकात दाखल झालाय. उत्तर कर्नाटकाचा संपूर्ण भाग मान्सूननं व्यापलाय. येत्या दोन तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्र आणि कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज पुणे वेध शाळेनं वर्तवला आहे. सध्या मान्सूनपूर्व पावसानं राज्यातला अनेक भाग चिंब केलाय.

पुणे आणि जळगावमध्ये आज मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावली. पुण्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. दुपारनंतर पावसाला सुरूवात झाली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, June 3, 2013, 18:43


comments powered by Disqus