Last Updated: Wednesday, May 23, 2012, 13:55
www.24taas.com, मुंबई एका बाजूला राज्याची आर्थिक स्थिती ढासळत असताना दुसरीकडं परदेशी गुंतवणूकदारांनीही राज्याकडे पाठ फिरवण्यास सुरूवात केलीय. फोक्सवॅगननं राज्यातली दोन हजार कोटींची गुंतवणूक काढून घेण्याचा निर्णय घेतलाय.
राज्याच्या करप्रणालीला कंटाळून पुण्याजवळील चाकणमधला नवीन प्रकल्प फोक्सवॅगननं गुंडाळलाय. ही कंपनी आता गुजरातमध्ये गुंतवणूक करणार आहे. फोक्सवॅगनचं पुण्याजवळ चाकणमध्ये आणखीन एक नवीन प्रकल्प उभारणार होती. पण, महाराष्ट्र सरकारच्या कर प्रणालीला कंटाळून अखेर फोक्सवॅगननं आपली दोन कोटींची गुंतवणूक काढून घेतल्याचा निर्णय घेतलाय.
गुंतवणूक काढून घेण्याची राज्यावर ओढवलेली नामुष्कीची ही काही पहिलीच घटना नाही. यापूर्वी जनरल मोटर्स, मारूती, फियाट आणि टाटांच्या नॅनोनंही महाराष्ट्रात गुंतवणुकीचा रस दाखवला होता. मात्र इथल्या जाचक धोरणांना कंटाळून त्यांनीही गुजरातच्या मार्गावरूनच धावणं पसंत केलं होतं. आता यात फोक्सवॅगनची भर पडलीय.
First Published: Wednesday, May 23, 2012, 13:55