राष्ट्रवादी राज्यात अगदी जोरात..... - Marathi News 24taas.com

राष्ट्रवादी राज्यात अगदी जोरात.....


झी २४ तास वेब टीम
 
राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपालिकेवर विजयाची पतका फडकावल्यानंतर आज ४६ नगरपालिकांचा निकाल येत आहे. यात देखील राष्ट्रवादीने आपला ठसा उमटवला आहे. राष्ट्रवादीने राज्यातील अनेक नगरपालिकेवर आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस हे वरचढ असल्याचे दिसून येते.
 
राष्ट्रवादीनं आजही त्यांची विजयी घोडदौड कायम राखली आहे. सांगली जिल्ह्यात आष्टा नगरपालिकेत सर्वच्या सर्व म्हणजे १९ पैकी १९ जागा जिंकत राष्ट्रवादीनं झेंडा फडकवला आहे . तासगाव आणि इस्लामपूरमध्येही राष्ट्रवादीनं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. आर.आर.पाटील आणि जयंत पाटील यांना आपापले गड राखण्यात यश आलं आहे.
 
उस्मानाबादमध्येही  भूम पालिकेवर राष्ट्रवादीचा विजय झाला. याआधीच राष्ट्रवादीनं ४७ नगरपालिकांवर वर्चस्व सिद्ध केलं. राष्ट्रवादीच्या या विजयी घोडदौडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. सांगलीत ढोल-ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करून कार्यकर्ते आनंद साजरा करत आहेत.

First Published: Wednesday, December 14, 2011, 11:11


comments powered by Disqus