Last Updated: Sunday, November 27, 2011, 13:38
झी 24 तास वेब टीम, मुंबई 
शिवसेना नेते दिवाकर रावतेंनी सरकारवर टीका केली. आचारसंहितेचं कारण पुढं करुन सरकार कापूस उत्पादकांना न्याय देत नाही. मात्र आयोगानं याबाबत स्पष्टीकरण दिल्यानं सरकारचं खर रुप उघड झाल्याचा आरोप रावते यांनी केला.
कापसाच्या दरावरून विरोधकांनी आंदोलनाची धार तीव्र केली. शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी कापूस दिंडी काढली. या दिंडीत रावते यांनी सरकारवर तोफ डागली. आचारसंहितेचं नाव पुढं करुन सरकार आपली जबाबदारी टाळत आहे असा आरोप रावते यांनी केला.
रावतेंची कापूस दिंडी सुरु असताना भाजप आमदार पाशा पटेल यांनी लातूर ते नागपूर अशी दिंडी काढली. शेतमालाच्या भावावरून सुरु असलेली शेतकऱ्यांची थट्टा थांबवा असा इशारा पाशा पटेल यांनी सरकारला दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पाशा पटेल यांच्या दिंडीला पाठिंबा दिला. विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांवरून सरकारवर दबाव वाढवला.
First Published: Sunday, November 27, 2011, 13:38