Last Updated: Monday, August 12, 2013, 19:18
www.24taas.com , झी मीडिया, मुंबईराज्यातल्या रिक्षाचालकांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसलंय. राज्यभरातले सर्व रिक्षाचालक येत्या २१ ऑगस्टपासून तीन दिवसांच्या संपावर जाणार आहेत. मुंबईत रिक्षाचालक आणि मालक संघटना कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. शरद राव यांच्या नेतृत्वाखाली हा राज्यव्यापी बंद पुकारण्यात आलाय.
रिक्षाचालक 21 ऑगस्टपासून 72 तासांच्या संपावर जाणार आहेत. रिक्षासंघटना 21 आणि 22 ऑगस्टला प्रादेशिक परिवहन कार्यालयावर आंदोलन करणार आहे. तर, 23 ऑगस्टला मुंबईतील परिवहन आयुक्तालय आणि इतर ठिकाणांच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
हकीम समितीनं दरवर्षी 1 मे रोजी दरवाढ करण्यात यावी, अशी शिफारस केली होती. मात्र अजूनही दरवाढ न झाल्यानं रिक्षाचालकांनी संपाचा निर्णय घेतला आहे. तसंच इतरही 18 मागण्या संघटनेकडून करण्यात आल्या आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, August 12, 2013, 19:18