सनी लिओनची भर रस्त्यात छेडछाड...

Last Updated: Tuesday, March 4, 2014, 20:52

मुंबईत अभिनेत्री सनी लिओन हिला भररस्त्यात छेडछाडीच्या प्रसंगाला सामोरं जावं लागलंय.

रिक्षा परवान्यांचे आता नव्याने वाटप

Last Updated: Sunday, January 26, 2014, 18:58

रिक्षा परवान्यांच्या वाटपासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे नव्याने रिक्षा परमिट आता उपलब्ध होणार आहे. परवाना अर्ज हा ऑनलाईन भरावा लागणार आहे. सोमवारी २७ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०१४ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहे.

रिक्षाचालकांचा 21 ऑगस्टपासून राज्यव्यापी संप

Last Updated: Monday, August 12, 2013, 19:18

राज्यातल्या रिक्षाचालकांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसलंय. राज्यभरातले सर्व रिक्षाचालक येत्या २१ ऑगस्टपासून तीन दिवसांच्या संपावर जाणार आहेत. मुंबईत रिक्षाचालक आणि मालक संघटना कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. शरद राव यांच्या नेतृत्वाखाली हा राज्यव्यापी बंद पुकारण्यात आलाय.

रिक्षाचालकांनाच नकोय भाडेवाढ...

Last Updated: Friday, April 27, 2012, 19:01

प्रादेशिक परिवहन विभागानं रिक्षांची भाडेवाढ केल्यानंतरही रिक्षाचालक मात्र भाडेवाढ मान्य करायला तयार नसल्याचा अजब नमुना नाशिकमध्ये पाहायला मिळतो आहे. ग्राहक शेअर रिक्षासाठीची ठरवून दिलेली भाडेवाढ मान्य करायला तयार नाहीत.

मुंबईत रिक्षाभाडेवाढीची अमंलबजावणी

Last Updated: Friday, April 20, 2012, 12:10

परिवहन विभागाने १९ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून १ रुपयाची रिक्षाभाडेवाढ जाहीर केली होती. या भाडेवाढीची आजपासून अमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत रिक्षाचे किमान भाडे आता १२ रूपये झाले आहे.

प्रवाशांची लूट, टॅक्सी-रिक्षावाल्यांनी केली बेछूट

Last Updated: Wednesday, April 18, 2012, 16:14

मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने मुंबईकर प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. रेल्वे स्टेशन्सवर प्रवाशांची गर्दी उसळल्याने अर्धा ते एक तासाने धावणाऱ्या रेल्वेमुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप करावा लागला.

रिक्षा संपकऱ्यांविरोधात RTOचा बडगा

Last Updated: Tuesday, April 17, 2012, 21:11

अंधेरी आरटीओनं 198 संपकरी रिक्षा मालकांना कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. मोटार वाहन अधिनियमानुसार रिक्षा चालकांचा हा संप शिक्षेस पात्र असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याच्या भूमिकेवर आरटीओ ठाम आहे.

शरद राव नरमले, संप एका दिवसासाठीच

Last Updated: Sunday, April 15, 2012, 17:54

संपात सहभागी न होणाऱ्या रिक्षाचालकांना धमकावणाऱ्यांवर कारवाईसाठी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यातील रिक्षा सोमवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला.

सेना - मनसेचा विरोध, रिक्षा संपाला....

Last Updated: Sunday, April 15, 2012, 14:26

शरद राव प्रणित रिक्षा युनियनच्या संपाला शिवसेनाप्रणित रिक्षा युनियननं विरोध केला होता. त्यामुळं १६ एप्रिलला होणाऱ्या रिक्षा चालकांच्या संपात फूट पडली आहे. शरद राव यांच्या मुंबई ऑटो रिक्षामेन्स युनियननं भाडेवाढीची मागणी करत संप पुकारला आहे.

रिक्षाचालकांचा संप.... होणारच....

Last Updated: Sunday, April 15, 2012, 13:26

आज मध्यरात्रीपासून मुंबईकरांना एका त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. राज्य सरकारनं मुंबईतल्या रिक्षाच्या किमान भाड्यात केलेली एक रुपयाची वाढ समाधानकारक न वाटल्यामुळे ऑटोरिक्षा मालक चालक संघटना कृती समितीनं नाराजी व्यक्त केली आहे.

आता रिक्षात ई-मीटर बसणारच...

Last Updated: Tuesday, April 3, 2012, 00:08

राज्यात २ एप्रिलपासून रिक्षांना ई-मीटर बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे मनमानी भाडे आकारणीपासून प्रवाशांची सुटका होणार आहे. परिवहन विभागानेही हे मीटर प्रवाशांच्या फायद्याचे असल्याचं म्हटलं आहे.

शरद राव म्हणतात, रिक्षा इलेक्ट्रॉनिक मीटर नको

Last Updated: Sunday, April 1, 2012, 17:20

शरद राव यांच्या रिक्षा युनियननं भाडेवाढीसाठी १६ एप्रिलपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. ई - मीटर सक्तीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा राव यांनी दिला आहे.

रिक्षाचालकांची मुजोरी तर वाढतेच आहे...

Last Updated: Thursday, March 22, 2012, 12:00

नवी मुंबईत भाडेकपातीच्या विरोधात रिक्षाचालकांचा संप तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. आज दुपारी १२ वाजता याबाबत रिक्षा संघटनांची राज्याच्या सचिवांसोबत बैठक होणार आहे.

नालासोपारामध्ये ७० ते ८० रिक्षांची तोडफोड

Last Updated: Sunday, December 4, 2011, 05:56

नालासोपारामध्ये ७० ते ८० रिक्षांची आणि ७ ते ८ टेम्पो फोडल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री आयोळे परिसरात ही घटना घडली. अज्ञात समाजकंटकांनी मध्यरात्रीच्या सुमारास ही तोडफोड केली.

रिक्षाचालकाला सावकाराची मारहाण

Last Updated: Thursday, December 1, 2011, 12:00

वसईत सावकारी कर्जातून एका रिक्षाचालकाला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली. तुलसीराम यादव असं या रिक्षाचालकाचं नाव असून, झेंडाबाजार परिसरात या रिक्षाचालकाला बेदम मारहाण करण्यात आली.

साला मै साब बन गया!!!

Last Updated: Sunday, November 13, 2011, 11:32

रिक्षाप्रवास म्हटला की, रिक्षावाल्याची अरेरावी आणि त्याची उद्धट उत्तरे असाच अनुभव बहुतांश ग्राहकांना येतो. मात्र पुण्यातील रिक्षावाले आता तुम्हाला अत्यंत सभ्यतेनं आणि कदाचित इंग्लिशमध्येही बोलताना दिसतील.