आघाडीत पुन्हा बिघाडी, स्वबळावर लढणार? - Marathi News 24taas.com

आघाडीत पुन्हा बिघाडी, स्वबळावर लढणार?

www.24taas.com,मुंबई

वॉर्डवाटपावरुन मुंबईत आघाडीत बिघाडीची चिन्ह आहेत. मुंबईत आघाडी होऊन आठवडा उलटत आला तरी, अजूनही वॉर्डवाटपाचा घोळ कायम आहे. वर्चस्व असलेल्या भागात राष्ट्रवादीला जागा हव्या आहेत, तर हक्काच्या जागा सोडण्यास काँग्रेसचा विरोध आहे. यातत काँग्रेसनं स्वबळावर निवडणूक लढवावी, असा एक मतप्रवाह काँग्रेसमध्ये असल्याचं समजत.
 
कवाडे आणि गवई गटाला 20 जागा सोडून उर्वरित सर्व जागा काँग्रेसनं स्वबळावर लढवाव्यात असा या गटाचा आग्रह आहे. आजच्या वॉर्डवाटपाच्या बैठकीतही कोणताही निर्णय हो शकला नाही, त्यामुळं चर्चेनंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या चेह-यावर नाराजी स्पष्टपणे जाणवत होती.
 
त्यातच संध्याकाळी पुन्हा वॉर्डवाटपावर तोडगा काढण्यासाठी बैठक होण्याची शक्यता आहे. मात्र वॉर्डवाटपाच्या तिढ्यानं आघाडीत पुन्हा बिघाडी निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्य़ात येतेय.

First Published: Monday, January 16, 2012, 18:29


comments powered by Disqus