`ती`च्या लढ्यासाठी अॅड. उज्ज्वल निकमांची नियुक्ती Adv. Ujjwal Nikam to fight case of Rape Victim

`ती`च्या लढ्यासाठी अॅड. उज्ज्वल निकमांची नियुक्ती

`ती`च्या लढ्यासाठी अॅड. उज्ज्वल निकमांची नियुक्ती
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या पाचही आरोपींना अटक करण्यात आलीय. त्यांच्याविरोधातला खटला फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत चालवला जावा यासाठी प्रयत्न सुरू आहे. विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पाचही नराधमांना कठोरातली कठोर शिक्षा मिळावी यासाठी सरकारतर्फे प्रयत्न केले जातील. मुंबईतल्या महिला फोटोग्राफवर गँगरेप प्रकरणी मुंबई पोलिसांना पाचही आरोपींना अटक करण्यात यश मिळालंय. या प्रकरणातील पाचवा आरोपी सलीम अन्सारी याला मुंबई क्राइम ब्रॅंचच्या पोलिसांना आज दिल्लीत अटक केली.

मुंबईमधील लोअर परळ भागात २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. लोअर परळ येथील शक्तिमील कम्पाऊंड येथे या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ही तरुणी एका मॅगझिनसाठी न्यूज फोटोग्राफर म्हणून काम करते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, August 25, 2013, 20:43


comments powered by Disqus