Last Updated: Sunday, August 25, 2013, 22:52
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमुंबई गँगरेप प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी अब्दुल सत्तार उर्फ चांद बाबू याच्या वयावरुन एक नविन अडचण समोर येऊन उभी ठाकलीय. आरोपीच्या घरच्यांच्या म्हणण्याप्रमाणे आरोपी हा अल्पवयीन आहे. मात्र पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपी हा अल्पवयीन नसल्याचा दावा करण्यात येतो.
आरोपींच्या घरच्यांनी मुलगा अल्पवयीन असल्याचा पुरावा देत त्याचा जन्मदाखला समोर आणलाय. या जन्मदाखल्यावर आरोपीची जन्म तारीख ही 26 फेब्रुवारी 1997 अशी नमुद केलीय. जर ही जन्मतारीख खरी असेल, तर आरोपीचं वय हे 18 वर्षाखालील म्हणून समजण्यात येईल. मात्र या जन्मतारखेत खाडाखोड झाल्याचही दिसून येतं. पोलिसांच्या म्हणन्यानुसार आरोपीच्या जन्मतारखेत जाणूनबुजून खाडाखोड करण्याचा प्रयत्न केला गेलाय.
तर सामूहिक बलात्कार प्रकरणात पकडण्यात आलेला आरोपी कासिम बंगाली मदनपुरा भागात राहतो. कासिमवर याआधी दरोडा, रेल्वेचं भंगार चोरून विकणे असे आरोप लागले आहेत. सहा महिने तो आर्थर रोडची हवा खाऊन आलाय.
त्याच्या परिसरात राहणा-यांनीही तो फुकट गेला असल्याची माहिती दिलीय. पण कासिम असं काही करणं शक्य नाही, मात्र पीडित मुलीने त्याला ओळखलं तर त्याला वाटेल ती शिक्षा द्या असं कासिमच्या आईने म्हटलंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, August 25, 2013, 22:52