Last Updated: Saturday, May 4, 2013, 17:25
www.24taas.com, मुंबईवरळीच्या सुखदा -शुभदा सहकारी गृहनिर्माण सोसायटीतील बेकायदा बांधकामप्रकरणी मुंबई महापालिकेने अजित पवार, पंतगराव कदम, शिवराज-पाटील चांकुरकर, गोपीनाथ मुंडे, माणिकराव ठाकरे नेत्यांना नोटीसा जारी केल्या होत्या.यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारानी सुखदा -शुभदा सोसायटीत एकही गाळा नसल्याचा दावा केला होता.मात्र अजित पवारांचे चार गाळे असल्याच उघड झालं आहे.
हे चार गाळे अजित पवार यांच्या नावाने १९ जानेवारी २००४ पासून नावावर असल्याचं शुभदाच्या कागदपत्रातून सिध्द झालं आहे. शुभदा सोसायटीमधील १ कोटी ४० लाख किमतीचे गाळे अजित पवारांच्या नावावर असल्याचं माहितीच्या अधिकारातून पुढे आलं आहे. अजित पवार यांच्या मालकीचे चार गाळे आहेत.
शुभदा सोसायटीतील नेत्यांच्या गाळयाचं गौंडबंगाल आरटीआय कार्यकर्त्यांनी उघड केलं आहे. अजित पवारांच्या गाळ्याची माहीती आरटीआय कार्यकर्ते अमित मारू यांनी दिली.
First Published: Saturday, May 4, 2013, 17:25