चिखलीकरांच्या डोक्यावर भुजबळांचा वरदहस्त? Bhujbal vs Somayya

चिखलीकरांच्या डोक्यावर भुजबळांचा वरदहस्त?

चिखलीकरांच्या डोक्यावर भुजबळांचा वरदहस्त?
www.24taas.com, नाशिक

सार्वजनिक बांधकाम विभागाचे लाचखोर मुख्य अभियंता सतीश चिखलीकर यांच्यामागे छगन भुजबळांचा वरदहस्त आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. मात्र भूजबळांनी हे आरोप फेटाळून लावलेत. आपली प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रयत्न असल्यातं भुजबळ म्हणालेत.

सार्वजनिक बांधकाम विभागातला मुख्य अभियंता चिखलीकर आणि कनिष्ठ अभियंता वाघ या दोघांकडे घबाड सापडलंय. त्यांची संपत्ती मोजता मोजता अधिका-यांचे डोळे अक्षरशः पांढरे व्हायची वेळ आली आहे.

चिखलीकरच्या लॉकरमध्ये ४ किलो सोनं आणि १ कोटी रुपये सापडलेत. याआधीच त्याच्या घरातून तीन कोटी जप्त करण्यात आलेत. चिखलीकरकडे बिअरबार आणि पेट्रोलपंपाची लायसन्सही सापडलीयत. त्याची विविध ठिकाणी बेनामी गुंतवणूक असल्याचंही उघड झालं.


एवढी संपत्ती कमावणाऱ्या चिखलीकरांवर छगन भुजबळांचा वरदहस्त असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. तर छगन भुजबळांनी हा आरोप नाकारत आपण कुठल्याही चौकशीला तयार असल्याचं म्हटलं आहे.

First Published: Saturday, May 4, 2013, 23:18


comments powered by Disqus