आसाराम बापूंच्या आश्रमात गैरप्रकार? स्थानिकांचा हल्लाबोल, Attack on Asaram Bapu`s ashrama by residents nearby

आसाराम बापूंच्या आश्रमात गैरप्रकार? स्थानिकांचा हल्लाबोल

आसाराम बापूंच्या आश्रमात गैरप्रकार? स्थानिकांचा हल्लाबोल
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

गोरेगावमध्ये असलेल्या आसाराम बापूंच्या आश्रमावर स्थानिकांनी हल्लाबोल केला. या आश्रमानं १ एकर जमीन बळकावल्याचा तसंच तिथं अनेक गैरप्रकार चालत असल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय...

मुंबईत गोरेगावमधल्या आसाराम बापूंच्या आश्रमावर स्थानिकांनी हल्लाबोल केला. या आश्रमानं खेळाच्या मैदानाची १ एकर जमीन बळकावल्याचा आरोप गेल्या अनेक दिवसांपासून होतोय. स्थानिकांनी यावर वारंवार आवाज उठवूनही काही उपयोग झाला नव्हता. अखेर आसाराम बापूंच्या अटकेनंतर स्थानिकांनी आपल्या रागाला वाट मोकळी करून दिली... गोरेगाव पूर्वेकडे असलेल्या मुक्ता सोसायटीच्या मालकीचं हे मैदान आहे. मात्र आश्रमानं दादागिरी करून ही जागा बळकावलीये.

केवळ मैदानच नाही, तर या इमारतीचा एफएसआयही आसाराम बापूंच्या आश्रमानं लाटलाय... त्यामुळे मुक्ता सोसायटीच्या पुनर्विकासातही अचडण निर्माण झालीये. या आश्रमात दिली जाणारी औषधं बोगस डॉक्टरच्या सल्ल्यानं विकली जात असल्याचा आरोपही स्थानिकांनी केलाय. त्यामुळे संपातपलेल्या रहिवाशांनी आश्रमावर धाव घेतली. सरकारनं महापालिकेला आदेश देऊन ही जागा त्वरित ताब्यात घ्यावी, अशी या रहिवाशांची मागणी आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, September 3, 2013, 21:18


comments powered by Disqus