अर्थसंकल्पाचा शेअरबाजारावर परिणाम Budget affects Share Market

अर्थसंकल्पाचा शेअर बाजारावर परिणाम

अर्थसंकल्पाचा शेअर बाजारावर परिणाम
www.24taas.com, मुंबई

यंदाच्या बजेटमध्ये केंद्रीय अर्थमंत्री यांनी केलेल्या तरतुदींना शेअर बाजाराने थंड प्रतिसाद दिला आहे. अर्थसंकल्प सादर होताना शेअर बाजार घसरला होता. मात्र अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजार काही प्रमाणात वधारला. बँक, ऑइल आणि गॅस, ऑटो आणि मेटलच्या शेअर्समध्ये काही प्रमाणात घट दिसून आली. तर कंझ्युमर ड्युरेबल्स, रिय़ल्टी, आयटी आणि एफएमसीजीच्या खरेदीत वाढ झाली आहे. मिडकॅप शेअर्स घसरले आहेत, तर स्मॉलकॅप शेअर्सची किंमत वाढली आहे.

सध्या BSE मधील ३० शेअर्सवाल्या इंडेक्स सेंसेक्स ५३ म्हणजे ०.३% वाढीसोबत १९,२०६ वर सुरू आहे. NSE च्या ५० शेअर्सच्या इंडेक्स निफ्टी १३.५० म्हणजे ०.२५% नी वाढून ५,८१० वर सुरू आहे.


बाजारात कोल इंडिया, टीसीएस, एचडडीएफसी बँक, विप्रो, सन फार्मा, डीएलएफ आणि जेपी असोसिएट्ससारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये १.५-२.८ टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे. तर आयसीआयसीआय बँक, मारुती सुझुकी, टाटा स्टील, हिंडाल्को, पॉवर ग्रिड, ल्यूपिन आणि पीएनबी सारख्यामोठ्या शेअर्समध्ये ०.७ %घसरण झाली आहे.

First Published: Thursday, February 28, 2013, 15:59


comments powered by Disqus