दुष्काळग्रस्तांच्या मदतीला आशा भोसले धावल्या, Drought, Asha Bhosle`s help of five million,

दुष्काळग्रस्तांच्या मदतीला आशा भोसले धावल्या

दुष्काळग्रस्तांच्या मदतीला आशा भोसले धावल्या
www.24taas.com, मुंबई

प्रसिध्द पार्श्वगायिका आशा भोसले यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतलाय. त्यांनी आर्थिक मदत केली आहे. आज आशा भोसले यांनी पाच लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केलाय.

आशा भोसले यांनी दुष्काळग्रस्तांना मदत करताना पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे जमा करण्यासाठी धनादेश दिला. मुख्यमंत्र्यांच्या `वर्षा` या निवासस्थानी जाऊन त्यांनी चव्हाण यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला.

हृद्येश आर्टस या संस्थेतर्फे हद्यनाथ मंगेशकर पुरस्काराच्या निमित्ताने देण्यात आलेले एक लाख रुपये दुष्काळ निवारण कार्यासाठी देणार असल्याचे आशा भोसले यांनी पूर्वीच जाहीर केले होते. त्यात आणखी चार लाख रुपये घालून एकूण पाच लाखांचा चेक त्यांनी मुख्यमंत्री चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला.

राज्यात दुष्काळामुळे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली असताना राज्य सरकारला मदत कार्यासाठी सहाय्य करणे हे सर्वांचे कर्तव्य असल्याचे भोसले यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे एकूण ११६ कोटी रुपये जमा झाले असल्याचे मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले.

First Published: Wednesday, April 24, 2013, 20:00


comments powered by Disqus