सेना-मनसेत जुंपली `अँड्रॉइड` फोनवरून! Fight between Shiv Sena & MNS on Androide Phones

सेना-मनसेत जुंपली `अँड्रॉइड` फोनवरून!

सेना-मनसेत जुंपली `अँड्रॉइड` फोनवरून!
हेमंत बिर्जे, www.24taas.com, मुंबई

मुंबई महापालिका नगरसेवकांना मोफत अँन्ड्रॉईड फोन देणारे आहे.२२७ नगरसेवकांना अँन्ड्रॉईड फोन खरेदीच्या प्रस्तावाला मनसेन विरोध केला आहे. त्यामुळे शिवसेना आणि मनसेत अँन्ड्रॉईड फोनवरना जुंपली आहे.

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांना हायटेक करण्यासाठी शिवसेना-भाजप युतीन अँन्ड्रॉईड फोन खरेदी करण्याचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत मंजूर केलायं. दोन कोटीत २२७ नगरसेवकांना लेपटॉप खेरदी केलेल्या पालिकेन आत्ता अँन्ड्रॉईड फोन खरेदीसाठी २५ लाख खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

अँन्ड्रॉईड फोन खरेदीच्या प्रस्तावाला मसने विरोध करत. मुंबईतील १५० नगरसेवकांकडे अँन्ड्रॉईड फोन आहेत.त्यामुळे पालिकेचे पैसे वाचवावेत यासाठी मनसे नगरसेवकांनी अँन्ड्रॉईड फोन न देता. अँन्ड्रॉईड फोनचे अंतर्गत प्रशिक्षण मिळावे अशी मागणी पालिका आयुक्ताकडे केली.

मनसेची मागणी विरोधासाठी विरोध असल्याची टिका मुंबईच्या महापौरांनी केली.या अँन्ड्रॉईड फोनमुळे पालिकेतील नगरसेवकांना रस्त्याच्या खड्डयाच्या तक्ररी आयुक्तांकडे करता येणार असल्याच स्पष्टोक्ती महापौरांनी केली आहे. मनसेच्या नगरेवकांनी आयुक्ततांना पत्र लिहून अँन्ड्रॉईड फोन खरेदी तात्काळा थांबवावी अशी मागणी केली आहे. मनसेच्या या विरोधामुळे शिवसेना आणि मनसेत अँन्ड्रॉईड फोनवरना जुंपली आहे.

First Published: Monday, February 11, 2013, 21:10


comments powered by Disqus