मंत्र्याचे दुष्काळी दौरे भंपकपणा - राज ठाकरे, raj thackeray in sangli

मंत्र्याचे दुष्काळी दौरे भंपकपणा - राज ठाकरे

मंत्र्याचे दुष्काळी दौरे भंपकपणा - राज ठाकरे
www.24taas.com,सांगली

मंत्र्यांनी दुष्काळ भागात दौरे काढून काय साधले आहे. ना दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळाना ना आधार. राजकीय नेते आणि मंत्र्यांनी केलेले दुष्काळी दौरे हे भंपकपणा आहे, अशी बोचरी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे केली.

राज ठाकरे आज सांगली दौऱ्यावर आहेत. दुष्काळाबाबत सरकावर जोरदार हल्लाबोल राज यांनी केला. दुष्काळाचे सरकारला काहीएक देणं घेणं नाही. केवळ दौरे काढण्यात मंत्री मग्न आहेत. काय मिळालं तुम्हाला, असा संवाद राज यांनी दुष्काळग्रस्तांशी साधला.

राज ठाकरे १२ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यापूर्वी शिवसेनेने तीन टोल नाके पेटवून दिले. त्यामुळे राज ठाकरे काय बोलतात याकडे लक्ष आहे. या आधीच राज यांनी टोल विरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळे सेनेचे आंदोलन हे कशाचे धोतक आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.

First Published: Monday, February 11, 2013, 14:34


comments powered by Disqus