Last Updated: Monday, February 11, 2013, 14:11
b>www.24taas.com,सांगली
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी महिला अत्याचाराबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. महिलांना तलवार भेट द्यावी लागेल, असे बेधडक वक्तव्य शर्मिला यांनी केलेय.
महिलांवरील अत्याचारात वाढ होत असल्याने, महिलांच्या हाती आता तलवार देण्याची वेळ आलीये. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमाणे बेधडक व्यक्तव्य केले. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत कठोर कावाईची गरज आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. त्यामुळे त्यांना तलवारी दिल्या पाहिजेत, असे म्हणाल्यात.
राज ठाकरेंबरोबर दौ-यात सहभागी झालेल्या शर्मिला ठाकरे यांनी सांगलीत महिलांशी संवाद साधला. अत्याचाराविरोधात लढण्याचं पाठबळ मिळवण्यासाठी यापुढे हळदी-कुंकुवाच्या कार्यक्रमांवेळी महिलांना तलवार भेट द्यावी लागेल, असं मत शर्मिला व्यक्त केलंय.
या आधी मुंबईत शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी महिलांना चाकू भेट दिले होते. त्यामुळे आता मनसेही मागे नसल्याचे शर्मिला ठाकरे यांनी दाखवून दिलेय.
First Published: Monday, February 11, 2013, 13:56